एणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा तळेले


बोदवड : बोदवड तालुक्यातील एणगाव ग्रामपंचायतीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत पॅनलने वर्चस्व राखले आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा अनंत तळेले यांची तसेच उपसरपंचपदी विश्वनाथ पाटील यांची निवड झाली. विजयी पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान हरसिंग पाटील, सुजीत विजयसिंह पाटील यांनी केले. योगेश रवींद्र पाटील, प्रदीप रघुनाथ तायडे, ग्रामपंचायत सदस्य शारदा विष्णू पारधी यांनी महत्त्वाची भूमिका घेत ग्रामपंचायत काँग्रेस-सेने कडे खेचून आणली.

यांनी केले सहकार्य
डॉ.श्रीकांत पाटील, जयसिंग पाटील, संतोष पाटील, पंडीत पाटील, प्रफुल्ल तळेले, संजय फिरके, नामदेव तायडे, प्रकाश पारधी, अजाब पारधी, रामेश्वर इंगळे, संदीप पाटील, सतीश पाटील, रमेश कोळी, नीना लवंगे, योगेश लवंगे, पंकज फिरके, अमोल भगवानसिंग राजपूत तसेच सर्व काँग्रेस कार्यकर्ते व सेनेच्या कार्यकर्त्यांनी व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. आमदार चंद्रकांत पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी अध्यक्ष उदयसिंग पाटील, माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील, गजानन खोडके, डॉ.सुधीर पाटील, ईश्वर जंगले यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले तसेच गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !