जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 19 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 57 हजार 591 वर : आतापर्यंत 55 हजार 823 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1367 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 19 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 591 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 367 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 34 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 08
जळगाव ग्रामीण 02
भुसावळ 04
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 03
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 02
अन्य जिल्हा 00


