जि.प.अध्यक्षांची रावेर पंचायत समितीला सरप्राईज व्हिजीट


विविध योजनांची केली पडताळणी : ग्रामीण भागातील नागरीकांची कामे वेळेत करण्याच्या सूचना

रावेर : जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी बुधवारी रावेर पंचायत समितीला सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी त्यांनी नवीन इमारतीची पाहणी करून जनतेची कामे वेळेत करण्याच्या सूचनादेखील दिल्या तसेच येथे तयार केलेल्या डेमो हाऊसची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांची कामे वेळेत करण्याच्या सूचना
जळगाव जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी त्यांनी नव्याने बांधकाम झालेल्या सर्व विभागाची पाहणी केली. अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामीण भागातून येणार्‍या लोकांची कामे वेळेवर झाली पाहिजे तसेच इतर कामाविषयी उपस्थित सर्वांना सूचना केल्या. यावेळी भाजपाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जितू पाटील, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे संदानशिव उपस्थित होते.

अपघातात मयत झालेल्या कुटुंबाचे केले सांत्वन
जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी पंचायत समिती भेटनंतर किनगावनजीक अपघातात मृत्यू झालेल्या आभोडा, विवरा, केर्‍हाळा, ता.रावेर येथील कुटुंबांचे सांत्वन केले व शासन मयत परीवाराला जास्तीत–जास्त मदत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पाटील रावेर सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पं.स.सदस्य योगीता वानखेडे, विवरा सरपंच युवराज भालेराव, वासू नरवाडे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !