माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनाही कोरोना
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वतः खडसे ट्वीट करून दिली आहे. खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोना झाल्याची बाब गुरूवारी समोर आल्यानंतर आता खडसेदेखील कोरोनाबाधीत झाले आहेत. प्रकृती व्यवस्थीत असून गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती खडसे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
हे देखील वाचा :खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण

खासदारांपाठोपाठ खडसेदेखील पॉझीटीव्ह
एकनाथराव खडसेंच्या स्नुषा व रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी सकाळी पॉझीटीव्ह आल्यानंतर माजमी मंत्री खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा तीन दिवसापूर्वी संपल्यानंतर त्यांनादेखील कोरोना झाल्याची बाब समोर आली होती.
