चोरट्यांचा पावणेतीन कोटींच्या दागिण्यांवर डल्ला


मुंबई : काळाचौकी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेवाडी परीसरातील मंगल ज्वेलर्सवर दरोड्यांनी दरोडा टाकत तब्बल दोन कोटी 82 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी मंगल ज्वेलर्सच्या बाहेरील रस्त्यावर बेस्टच्या विजेच्या खांब्यांवरील वीज कट केली आणि ब्लॅकआऊट केला. जेणेकरून अंधारात चोरट्यांनी ओळख पटणार नाही. नंतर कटरच्या सहाय्याने शटरचे लॉक तोडून दरोडेखोर दुकानात शिरले. दुकानातील सर्व दागिन्यांची लूट करून या दरोडेखोरांनी आपली चोरी पकडली जाऊ नये याकरीता दुकानातील सीसीटीव्ही फुटेज सेव्ह असलेली डीव्हीआर मशीनच लांबवल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !