लाखोंच्या बनावट नोटांसह भामटा जाळ्यात


मुंबई : कर्ज फेडण्यासाठी घरातच नोटा छापण्याचा कारखाना सुरू करणार्‍या भामट्याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद फकीयान अयूब खान असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. एक तरूण चेंबूर येथे बनावट नोटांची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचत एमएमआरडीए कॉलनीजवळ माहुल गावात सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तपासा दरम्यान आरोपीने पोलिसांना काही बनावट नोटा घरी ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. यामध्ये 3 लाख 98 हजार 550 रुपयांच्या नोटा आणि इतर साहित्य जप्त केले.

कर्ज डोईजड झाल्याने बनवल्या बनावट नोटा
आरोपीने तरुणाने पत्नीचे दागिने गहान ठेऊन कपड्यांचा व्यवसाय सुरू केला मात्र लॉकडाऊनमध्ये फटका बसल्याने कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हतं आणि नोकरी मिळणे लॉकडाऊनमुळे अवघड होते म्हणून खानने नकली नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला आणि शेवटी तुरुंगात पोहोचला. विशेष म्हणजे या नोटा कशा बनवायच्या हे तो यू ट्यूब व्हिडीओ पाहून शिकला. आरोपीने अगोदर फक्त 50 आणि 100 रुपयांच्या दहा हजार नोटा बनवल्या. त्या बनावट नोटा आपल्या मित्राला दिल्या परंतु मित्राला देखील बनावट नोटा असल्याचे लक्षात आले नाही याची खात्री झाल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यानी 30 हजार नोटा छापल्या. आतापर्यंत आरोपीने चार लाख नोटा छापल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !