माजी मंत्री खडसेंना वारंवार होणार्या कोरोनावर व्हावे संशोधन
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा टोला : जळगाव जिल्ह्यात वेगळाच कोरोना
जळगाव : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना दोन महिन्यात तीन वेळा कोरोना झालाच कसा? यावर शास्त्रज्ञांकडून संशोधन करावे, अशी मी सरकारकडे मागणी केली असल्याचा टोला भाजपाचे माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी लगावला आहे शिवाय खडसेंना कोरोना झाल्याने त्या विषयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जळगावात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपींग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळाच कोरोना असल्याचाही टोला महाजन यांनी लगावला.

