मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवारांनी रद्द केले कार्यक्रम


मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व राज्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !