20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर भाजपा पदाधिकार्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहडोल जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी याप्रकरणी विजय त्रिपाठीचं नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले. आरोपींनी पीडीतेचे अपहरण करीत जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परीसरातील फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीनं दारू पाजली आणि 18 तसेच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोरच गंभीर अवस्थेत फेकून निघून गेले. यानंतर पीडितेने 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी पसार असून पोलीस तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.