भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळेंना कोरोना


जळगाव : भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार भोळे म्हणाले की, अधिवेशनासाठी जायचे असल्याने कोरोना तपासणीसाठी नुमने दिले होते. त्यामध्ये कोरोना असल्याचे निष्पन्न झालेे. मात्र, त्यापूर्वी कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झालो आहे. उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन आमदार भोळे यांनी केले आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !