भुसावळात मंगळवारी बुथ कार्यकर्ता संमेलन
भुसावळ- भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ कार्यकर्ता संमेलन मंगळवार, 17 रोजी दुपारी एक वाजता संतोषी माता हॉलमध्ये होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
या संमेलनामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नामदार हरीभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे, अशोक कांडेलकर, डॉ.राजेंद्र फडके, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील व भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, हर्षल पाटील,
नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित राहतील.
पदाधिकार्यांचे उपस्थितीचे आवाहन
या कार्यकर्ता संमेलनाला भुसावळ विधानसभा क्षेत्रातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरचिटणीस रमाशंकर दुबे व पवन बुंदेले, भालचंद्र पाटील, नारायण कोळी व विस्तारक दिनेश नेमाडे यांनी केले आहे.