राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जळगावचा नागपूर व अमरावतीवर विजय

भुसावळ- महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित 19 व्या राज्यस्तरीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगावने नागपूरला 25 धावांनी पराभव करीत विजयी सलामी दिली व दुसर्या सामन्यात अमरावतीला दोन गड्यांनी नमविले. दोंडाईचा हस्ती चॅरीटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेज दोंडाईचा येथे आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्यातील 30 जिल्ह्याील संघांनी सहभाग घेतला. जळगाव संघाने नागपूर संघाला 25 धावांची नमविले. प्रथम फलंदाजी करताना जळगाव ने 62धावा केले होते प्रत्युत्तरात नागपूरला फक्त 37 धावाच करता आल्या. दुसर्या सामन्यात जळगाव ने अमरावतीला 50 धावांत रोखले निर्धारित लक्ष जळगावने 1 ओवर व दोन गडी 2 गडी राखत अमरावतीला नमविले.
यांची स्पर्धेसाठी उपस्थित
स्पर्धेचे उद्घाटन हस्ती, क्रीडा संकुल मैदानावर दोंडाईचा नगरपरीषदेचे नगरसेवक निखील राजपूत, महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष डॉ.सलीम फारूखी, उपाध्यक्ष बाबुलाल धोत्रे, सचिव मोहम्मद बाबर, उत्तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वासेफ पटेल, नाशिकचे मुकुंद झनकर, धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष दिनेश वोरा, हस्ती स्कूल स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ.विजय नामजोशी व प्राचार्य हरीकृष्ण निगम, प्रतीक कुलकर्णी, तारेख पटेल, विनोद राठोड आदींच्या उपस्थितीत झाले. दरम्यान, बाबुलाल धोत्रे, सलीम फारूखी तसेच डॉ. विजय नामजोशी, निखील राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले.
