भाजपा संकट मोचक गिरीश महाजनांना कोरोनाची बाधा
जामनेर : भाजपाचे संकट मोचक म्हणून ओळख असलेया माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जामनेरमध्ये क्वॉरंटाईन होऊन त्यांनी उपचार सुरू केले आहेत. आमदार गिरीश महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
