पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण


जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता उलथवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजवणारे शिवसेना नेता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पालकमंत्री हे मुंबईतच असून शुक्रवारी ते नेमक्या कुठल्या रुग्णालयात दाखल होतात याबाबतची माहिती कळू शकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !