‘मी जबाबदार’ घोषणेची अंमलबजावणी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांनी नागरीकांसह पदाधिकार्‍यांना आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनिविरुद्ध लढताना अखेर कोरोनाने गाठले असलेतरी या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा लवकरच आपल्या सेवेत हजर होईल, हा ठाम विश्‍वास आहे. मी सध्या मुंबई येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून आता प्रकृती चांगली आहे. यामुळे कुणी काळजी करू नका, आणि आपले माझ्यावर खूप प्रेम असले तरी, कृपया कुणी येथे भेटण्यासाठी येऊ नका. आणि हो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका. कोरोनामुळे आधीच अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. यामुळे आपण सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षित रहा, रूग्णांची मदत करा. मी काही दिवसांपर्यंत सार्वजनीक कार्यक्रम तसेच वैयक्तीक सुख-दु:खात सहभागी होऊ शकणार नाही. तेव्हा आपणच माझे प्रतिनिधीत्व करा, जनतेच्या मदतीसाठी धावून जा तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी ‘मी जबाबदार’ ही दिलेली घोषणा पूर्णपणे लक्षात ठेवा, यानुसारच अंमलबजावणी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एकजुटीने कोरोनाला हरवू या !
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता या सर्वांच्या एकजुटीनेच आपण कोरोनाला हरविणार आहे. यामुळे मी आपल्यात काही दिवस नसलो तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका हेच माझे कळकळीचे आवाहन आहे. मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईल, तोवर कोरोना विरूध्दच्या लढाईची सूत्रे ही आपल्याकडेच असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी जनसेवा करावी, हीच अपेक्षा असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !