गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रावेरात भाजपाचे आंदोलन
रावेर : आघाडी सरकारच्या काळात विकासकामे ठप्प झाली असून आघाडी सरकारच्या खंडणी वसुली करणार्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा व त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी रावेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देवून भ्रष्ट शासनाचा निषेध केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीण महेश चौधरी, महेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समितीम सदस्य योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, हरलाल कोळी, संदीप साळवे, मनोज श्रावगे, तालुका युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, रवींद्र पाटील, शुभम पाटील यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




