वरणगावात आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाची घोषणाबाजी


वरणगाव : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे याच्याकडून दर महिन्याला शंभर कोटी हप्त्याची मागणी केली होती, असा दावा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात केला असून या गंभीर प्रकारानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांनी महामार्गावर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील, चौधरी, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसूफ खान, गजानन वंजारी, मिलिंद भैसे, गंभीर माळी, आकाश निमकर, तेजस जैन, डॉ.प्रवीण चांदणे, भाऊलाल टिंटोरे, पप्पू ठाकरे, शंकरअण्णा पवार, कमलाकर मराठे, कृष्णा माळी, संदीप माळी, जावेद शाह, अंकुश साबळे, प्रशांत बावणे, जिगर पालवे, योगेश काळे, रमेश पालवे, छोटू सेवातकर, दीपक चौधरी, राहुल जंजाळे, अनिकेत चांदखेडकर यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक गणपुरे, सहा.निरीक्षक संदीप बोरसे यांनी पोलीस बंदोबस्त राखला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !