गृहमंत्र्यांनी द्यावा राजीनामा : यावलमध्ये भाजपा पदाधिकारी आक्रमक


यावल : पोलिसांकडून शंभर कोटींची दरमहा मागणी करणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यावलमधील भाजपा पदाधिकार्‍यांनी निषेध करीत त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली. खंडणीखोर देशमुखांनी राजीनामा न दिल्यास तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील तालुुका भाजपाच्या वतीने येथील तहसील कार्यालयात भारती भुसावरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

यांची निवेदनावर स्वाक्षरी
निवेदनावर जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्या सविता अतुल भालेराव, हिरालाल व्यंकट चौधरी, नगरसेक डॉ.कुंदन फेगडे, सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील, उपसभापती योगेश भंगाळे, निलेश गडे, उमेश पाटील, योगराज भंगाळे, अनंत नेहेते, योगेश साळुंखे, रामभाउ होले, व्यकंंटेश बारी, अतुल भालेराव, साहेबराव बडगुजर, विजय मोरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !