एरंडोलमध्ये पाच दिवसांचा जनता कर्फ्यू


एरंडोल : सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एरंडोल नगरपरीषद हद्दीत 24 मार्च ते 28 मार्च या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून त्याबाबत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी 22 रोजी आदेश काढले आहेत.

जनता कर्फ्यूत हे राहणार बंद
सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी-विक्री केंद्र, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील. केवळ पूजारी हे दैनंदीन पूजा करतील मात्र नागरीकांना मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीव्हरी पार्सल वगळता बंद राहतील. सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपिंग मार्केट, बार्बर शॉप, स्पा सलून, लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले, बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील. दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मीडिया सेवा, कुरीयर, पेट्रोल पंप, अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील. आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय 50 टक्के उपस्थिती, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील. आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ, पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील. दरम्यान, वरील निर्बंधातून दूध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर, अ‍ॅम्बुलन्स सेवा, नगपरीषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !