तळोंदा विकासो चेअरमनपदी भारती अहिरराव बिनविरोध


चाळीसगाव : तळोंदा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका भारती प्रदीप अहिरराव यांची मंगळवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विकासोचे सदस्य, सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी विकासाचे उपक्रम राबविण्याला आपले प्राधान्य राहील, अशी भावना भारती अहिरराव यांनी यावेळी व्यक्त केली. निवडीनंतर त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. चाळीसगाव एज्युकेश सोसायटीच्या आ.बं.मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड.प्रदीप वसंतराव अहिरराव यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !