कोरोना सुसाट ! : एकाच दिवसात 12 रुग्णांचा मृत्यू : जिल्ह्यात 1093 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 79 हजार 563 वर : एकाच दिवसात 977 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 1093 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1513 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 79 हजार 563 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 68 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 977 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 356
जळगाव ग्रामीण 36
भुसावळ 66
अमळनेर 76
चोपडा 100
पाचोरा 12
भडगाव 22
धरणगाव 70
यावल 43
एरंडोल 55
जामनेर 31
रावेर 35
पारोळा 25
चाळीसगाव 95
मुक्ताईनगर 33
बोदवड 33
अन्य जिल्हा 05




24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव शहरातील 56, 68 व 85 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तसेच भुसावळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरूष व 48 व 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला व अमळनेर तालुक्यातील 74 वर्षीय पुरूष, बोदवड तालुक्यातील 50 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरूष व यावल तालुक्यातील 64 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

