मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्स पाळा : गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल
रावेर : कोरोनापासून सुरक्षीत राहण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळा तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी यांनी निंबोल व अजंदे येथील ग्रामस्थांना केले. बुधवारी रावेर पंचयात समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यातील निंबोल व अजंदे येथील ग्रामपंचायतीला सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन, प्रलंबीत घरकुल योजना, ड च्या अपडेशन, ग्राम पंचायत कर वसूली संदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या. जि.प.शाळेलाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी सोनवणे, ग्रामसेवक एम.डी.पाटील आदी उपस्थित होते.





