बँकांच्या लागोपाठ सुट्या : ऑनलाइन व्यवहारात सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
सावदा : सावदा पोलिस स्टेशनतर्फे ऑनलाईन व्यवहार करणार्या नागरीकांना सावधान राहण्याचे आवाहन सावदा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी केले आहे. पुढील आठवड्यात बँकेला लागोपाठ सुट्ट्या येत असल्याने नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क रहावे आणि ऑनलाईन फसवणूक करणार्यांपासून काळजी घ्यावी जेणेकरुन या सुट्ट्यांमध्ये आपली फसवणूक होवू शकते कारण बँक बंद असल्याने आपली बँकेच्या संदर्भात कोणतीच माहिती आपणास आलेल्या अज्ञात फोन धारकांना किंवा कोणाला सांगू नका तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपल्याकडील माहिती शेअर करु नका, कारण बँकेच्या सुट्टी च्या दिवशी ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक ह्या सुट्टीच्याकाळात लोकांची जास्तीजास्त फसवणूक करीत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी केले आहे.





