यावल एमआयएम शहराध्यक्षपदी आबीद खान
यावल : एमआयएम रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये काही पदाधिकार्यांची फेर नेमणूक करण्यात आली. यावल शहराचे शहराध्यक्ष पदावर आबीद खान यांची फेर निवड करण्यात आली व उपाध्यक्ष पदावर वसीम शेख यांची निवड झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्यासोबत भुसावळ तालुका अध्यक्ष अशरफ तडवी, जिल्हा महासचिव कलीम शेख, युवा जिल्हा अध्यक्ष नावेद खान, युवा कार्यकर्ता आवेस खान, यावलचे नवनियुक शहराध्यक्ष आबीद खान, उपाध्यक्ष वसीम खान, एजाज मौलाना, हनीफ खान आणि वसीम शेख हे उपस्थित होते.
