डॉक्टर महिलेवर अत्याचार : व्हिडिओ व्हायरची धमकी देत अडीच कोटी उकळले
मुंबई : ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचे अत्याचाराचे व्हिडिओ काढण्यात आले व या पोटी तब्बल अडीच कोटी महागड्या कार व सोने उकळल्याची घटना नागपाडा परीसरात घडली. याप्रकरणी सय्यद युसुफजमाल षमविल (47) विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला.
नागपाडा पोलिसात गुन्हा
तक्रारदार 41 वर्षीय डॉक्टर असून 2014 मध्ये पतीविरुद्ध सुरू असलेल्या तक्रारीबाबत पोललिस आयुक्त कार्यालयात ये-जा करत असताना, त्यांची सय्यदसोबत ओळख झाली. सय्यद हा नागपाडा येथील डिमटीकर रोड परीसरात राहण्यास असून 2014 मध्ये सय्यदने मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सांगून डॉक्टरांना घरी बोलावत अत्याचार केला व शुद्धीवर आल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दागिन्यांची मागणी सुरू केली. अशात महिलेने याबाबत बहिणीला सांगताच तिच्याकडूनही पैसे उकळण्यास सुरुवात झाली. 2014 ते एप्रिल 2020 पर्यंत सय्यदने डॉक्टरांकडून 40 तोळे सोने आणि दीड कोटी रुपये उकळले तर त्यांच्या बहिणीकडून 100 तोळे सोने, एक कोटी रुपये तसेच त्यांच्या तीन गाड्या बळजबरीने ताब्यात घेतल्या. अशात, वेळोवेळी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नेहाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. वाढत्या अपेक्षांमुळे त्यांनी 21 मार्च रोजी त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी पसार झाला आहे.




