15 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1124 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 84 हजार 289 वर : एकाच दिवसात 901 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 1124 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1569 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 84 हजार 289 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 71 हजार 778 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 400
जळगाव ग्रामीण 27
भुसावळ 123
अमळनेर 15
चोपडा 256
पाचोरा 29
भडगाव 00
धरणगाव 48
यावल 03
एरंडोल 28
जामनेर 48
रावेर 29
पारोळा 34
चाळीसगाव 40
मुक्ताईनगर 20
बोदवड 22
अन्य जिल्हा 02

24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 60, 67 वर्षीय पुरुष व 28, 68, 72 वर्षीय महिलेचा,

भुसावळ तालुक्यातील 47, 57, 61, 70 वर्षीय पुरुषाचा,

चोपडा तालुक्यातील 75 व 83 वर्षीय महिलेचा

धरणगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष

एरंडोल तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा

यावल तालुक्यातील 53 वर्षीय पुरुषाचा

पाचोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला


कॉपी करू नका.