‘त्या’ दिव्यांग महिलेवर अत्याचार करणार्‍याविरोधात अखेर गुन्हा


बोदवड : शहरातील 30 वर्षीय अपंग विधवा पीडितेला तब्बल चाळीस 40 दिवसांच्या पाठपुराव्याने न्याय मिळाला असून पीडीतेच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी आरोपी लखन माळी याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेला न्याय मिळण्यासाठी तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रदेश अधेक्षय धनराज गायकवाड, उपाध्यक्ष अंजली पाटील, जळगाव येथील चर्मकार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे, आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा अधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती.


कॉपी करू नका.