कायदा सर्वांना समान : रावेरात मास्क न लावणार्‍या पोलिसांना दंड


रावेर : कायदा सर्वांसाठी समान असल्याचा प्रत्यय रावेरच्या पोलिस निरीक्षकांनी देत मास्क न लावणार्‍या दोघा पोलिसांना दंड केला.
रावेर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड आणि सुकेश तडवी हे दोघे पोलिस ठाण्यात विना मास्क फिरत होते. हा प्रकार निरीक्षक रामदास वाकोडे यांना आढळून आला. यानंतर फिरत्या तपासणी पथकाचे प्रमुख कर्मचारी भागवत धांडे यांनी वाकोडे यांच्या सूचनेवरून या दोघा कर्मचार्‍यांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला.


कॉपी करू नका.