सावदा शहरात पोलिसांचा रुट मार्च : रस्त्यांवर शुकशुकाट


सावदा : जळगाव जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात 28 ते 30 मार्च असा तीन दिवस कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर सावदा शहरात रविवार, 28 रोजी सकाळी सावदा पोलिसांनी शहरातून रुटमार्च काढला. या रूट मार्चमध्ये सावदा पोलिसांसोबतच नगरपालिका कर्मचारीदेखील सहभागी झाले.

केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू
शहरातील मुख्य रस्त्यांसोबत इतर भागातूनदेखील हा रुट मार्च मार्गस्थ झाला. यावेळी सावदा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपनिरीक्षक पवार, नगरपालिका बांधकाम अभियंता धनराज राणे यांच्यासह सावदा पोलीस, होमगार्ड जवान, पालिका कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, 28 पासून हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर शहरात होळी असल्यावरदेखील संपूर्ण शुकशुकाट होता. सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली तसेच शहरात जागोजागी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरीकांनीदेखील प्रशासनास सहकार्य केले. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दुध डेअरी केवळ सुरू असल्याचे दिसून आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !