भुसावळकरांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद


विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर पोलिसांकडून धडक कारवाई

भुसावळ : जिल्ह्यातील कोरोना उद्रेकानंतर जिल्हधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी कडक निर्बंध (लॉकडाऊन) जाहीर केल्यानंतर पहिल्याच दिवशी रविवारी भुसावळकरांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विनाकारण बाहेर फिरणार्‍यांसह मास्क न लावणार्‍यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.बसस्थानकावर दुपारनंतर शुकशुकाट दिसून आला तर अनेक बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी शहरात येण्याचे टाळल्याचे चित्र होते. अत्यावश्क आरोग्य विषयी सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णपणे कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.

व्यापार्‍यांकडून बंदला प्रतिसाद
जळगाव जिल्ह्यात तिन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर रविवारी शहरातील व्यापारी पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठचे सहा.अधीक्षक अर्चित चांडक तसेच तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात मास्क न लावणार्‍यांसह विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !