फैजपूरवासीयांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
फैजपूर : जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या फैलावानंतर 28 ते 30 दरम्यान जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला असून गेल्या दोन दिवसांपासून शहरवासीयांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळी बस स्थानकाजवळ डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे, फौजदार रोहिदास ठोंबरे, फौजदार मकसूद शेख यांच्यासह होमगार्ड पथक व पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली तसेच विना मास्क व नियमांचे उल्लंघण करणार्या वाहन धारकांकडून दहा हजार रुपयांच्या जवळपास दंड वसूल करण्यात आला. बस स्थानकात प्रवाशांची संख्या रोडावल्याने अनेक बस फेर्या रद्द करण्यात आल्या.





