भुसावळ विधानसभेची जागा रीपाइंला सोडण्यासाठी आग्रह


उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ कापसेंची भुसावळात माहिती

भुसावळ- भुसावळ विधानसभेची जागा यंदा रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ला सोडावी यासाठी वरीष्ठ स्तरावर बोलणी सुरू असून मुंबईत 21 रोजी होणार्‍या बैठकीतदेखील हा विषय छेडला जाणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ कापसे यांनी येथे सांगितले. बुधवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. कापसे म्हणाले की, भुसावळ विधानसभा मतदारसंघात मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठी असल्याने भाजपनेही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार लादु नये, आम्हाला डावलले गेले तर मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही व तसे झाल्यास आम्ही इतिहास घडवू, असा इशाराही त्यांनी दिला. प्रसंगी राज्य उपाध्यक्ष व प्रभारी रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्यासह संपर्क प्रमुख अनिल गांगुर्डे, लक्ष्मण जाधव, सुनील आंभोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.