भुसावळात टरबूजाआडून गांजा तस्करीचा डाव उधळला : तिघे आरोपी जाळ्यात


भुसावळसह सुरतचे तिघे आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात : मुख्य आरोपी पसार : शहरातून गांजा तस्करीचा संशय

भुसावळ : टरबूजाआड गांज्याची तस्करीचा डाव बाजारपेठ पोलिसांनी उधळला लावत तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शनिवारी पहाटे तीन ते चारदरम्यान नाहाटा महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून सुमारे साडेआठ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून गांजा तस्करी करणारा मुख्य मालक पसार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात गेल्या काही वर्षात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने बाजारपेठ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. अटकेतील तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये दोन सुरतच्या तर एक भुसावळातील आरोपीचा समावेश आहे.

या आरोपींना अटक
गांजा तस्करीप्रकरणी पोलिसांनी शब्बीर कालेखान पठाण (40, अकबर की वाडी, खोलवड, ता.कामरीज, जि.सुरत), शेख अकील शेख लतीफ (34, बापूनगर, झोपडपट्टी खोलवाडा, ता.कामरीज, जि.सुरत) व शेख शरीफ शेख (33, मुस्लीम कॉलनी, उस्मानीया मशीदजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. मुख्य आरोपी हमी समशोद्दीन पतंगवावा (नवीन ईदगाहच्या पाठीमागे, भुसावळ) हा पसार झाला आहे तर आरोपींच्या ताब्यातील दोन टेम्पो जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश रामदास धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल छबूराव मोरे, हवालदार जिजाबराव पाटील, अयाज अली, सुनील सोनवणे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, ईश्‍वर भालेराव, करतारसिंग पररेशी आदींच्या पथकाने केली. तपास सुनील सोनवणे, अनिल पाटील, किशोर महाजन करीत आहेत.


कॉपी करू नका.