चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
A youth from Chalisgaon taluka died in a two-wheeler accident पाचोरा : अज्ञात वाहनाच्या धडकेत चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ हा अपघात घडला. घटनास्थळावरून अज्ञात वाहन चालक पसार झाला.
डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू
पाचोरा ते भडगाव रोडवर असलेल्या अंतुर्ली फाट्याजवळ पाचोर्याहुन भडगावच्या दिशेने मोटरसायकल (एम.एच.41 बी.बी.0451) वरुन जाणार्या यशवंत भगवान माळी (23, मांदुर्णे, ता.चाळीसगाव) यांना भडगावहून पाचोर्याच्या दिशेने येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत यशवंत माळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मयत खाजगी फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धडक देणारे अज्ञात वाहन अंतुर्ली गावाच्या दिशेने पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून यशवंत माळी यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यशवंत माळी हे खाजगी फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने मांदुर्णे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. धडक देणार्या अज्ञात वाहनाचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. मयत यशवंत माळी हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.