दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचे संकेत


मुंबई : अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली असतानाच आता नवे गृहमंत्री कोण? याविषयी खलबते सुरू झाली आहे. आता राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागल्याचे संगून असून दिलीप वळसे पाटलांकडे यांच्याकडे असलेल्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : पदावर राहणे योग्य वाटत नसल्याने राजीनाम्याचा निर्णय

अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारीत केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.


कॉपी करू नका.