शिलाई मशीनच्या नावाखाली लाखोंची फसवणूक


यावल : यावल आदिवासी एकात्मीक विकास कार्यालयामार्फत आदिवासी युवक-युवती लाभार्थी यांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्याच्या नांवाखाली लाखो रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली उडाली आहे. याबाबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबादच्या सचिवासह दोघांविरुद्ध गुन्हा
यावल आदिवासी एकात्मीक विकास कार्यालयाच्या माध्यमातुन दिनांक 4 एप्रिल 2014 ते 28 सप्टेंबर 2017 या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतीज्योती प्रमिलाजी चव्हाण महीला मंडळ या संस्थेस अटी-शर्तीच्या अधीन राहुन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 118 आदिवासी युवक युवतींना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नऊ हजार 700 प्रत्येकी लाभार्थीच्या प्रशिक्षणासाठी 11 लाख 44 हजार रुपये या संस्थेला देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या संस्थेच्या वतीने आदिवासी युवक-युवतींना कोणतेही प्रशिक्षीताकडुन कोणतेही प्रशिक्षण न देता शिलाई मशीन न देता व कुठलेही प्रमाणपत्र न देता एक दिवस शाळेची निवड करून एका हॉलमध्ये लाभार्थींना बसवून त्यांचे फोटो काढुन कुठलेही प्रशिक्षण न देता गोरगरीब आदिवासी लाभार्थींची फसवणूक केली आहे. या संदर्भात आदिवासी एकात्मीक विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुर्जगरांव झंपलवाड (52) वर्ष यावल पोलिसात क्रांतीज्योत प्रमिलाजी महिला मंडळ, औरंगाबाद या संस्थेच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (लोहारा, पोस्ट मंगरूळ, ता.मानवत, जि. परभणी), शिवाजी रमेश जाधव (दक्षिण विहार, अपार्टमेंट कांचनवाडी), पैठण रोड, औरंगाबाद) यांनी संगनमताने आदिवासींना कुठलेही प्रशिक्षण न देता शासकीय निधीचा गैरव्यवहार करून शासनाची व आदिवासींची फसवणूक केल्यने दोघांविरूद्ध यावल पोलिसता भादंवि कलम 420, 406, 465 , 468 , 471 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहेत.


कॉपी करू नका.