लग्नाच्या बहाण्याने 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार


कुर्डूवाडी : लग्नाचे आमिषोन माढा तालुक्यातील एका गावात तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. कुर्डूवाडी पोलिसांनी गहिनीनाथ नरोटे व दत्तात्रय नरोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 22 वर्षीय तरुणीच्या घरी दूध देण्यासाठी गहिनीनाथ नरोटे यायचा. यातून त्याने ओळख वाढवली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संबंधित आरोपीने 6 ऑक्टोबर 2020 ते 21 ऑक्टोबर 2020 काळात तो तिला घेऊन खोली करून राहिला. तिथे एकत्र असताना लग्न करण्याचे आश्वासन देत अत्याचार केला. 21 ऑक्टोबर 2020 रोजी त्या तरुणीने सर्व प्रकार आईला सांगितला. दरम्यान, आरोपीने तरुणीवर संशय व्यक्त करीत शिवीगाळ केली. ही बाब आरोपीचे वडील दत्तात्रय नरोटे यांना समजली. 30 डिसेंबर 2020 रोजी बाप लेक तरुणीच्या घरासमोर येऊन तुला बघतोच अशी धमकी दिली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.