तरवाडे येथून साडे चार लाखांचे डांबर लंपास
चाळीसगाव : डांबरच्या भरलेल्या टँकर मधून नऊ टन डांबर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तरवाडे येथील परीसरात घडल्याने खळबळ उडाली. विजय चंद्रमा आशण्णा (35, रा. काजीवाडा औरंगाबाद) यांच्या ालकीचे तालुक्यातील तरवाडे येथील गट क्र. 263 येथून अज्ञात इसमाने भरलेल्या टँकरमधील 9 टन डांबर 6 ते 7 एप्रिल दरम्यान चोरून नेले असून या डांबराचे साडेचार लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. विजय चंद्रमा आशण्णा यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज सायंकाळी अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.




