भुसावळातील माहेश्वरी तहसील सभेच्या भूतदयेचे सर्वत्र कौतुक
भुसावळ : माहेश्वरी तहसील सभाद्वारे पक्ष्यांच्या पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी धान्य मिळावे हा उद्देश समोर ठेवून डब्बा बनवण्यात आला. कडक उन्हाळ्यात जशी मानवाला पाण्याची तहान लागते तशचे पशू- पक्ष्यांना ही पाण्याची गरज भासते मात्र उन्हाळ्यात पाण्याची सगळी कडे टंचाई असते व पक्ष्यांना पाणी लवकर मिळत नाही त्यामुळे कित्येक पक्षी पाण्याअभावी मृत्यु पावतात. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे हे उद्देश समोर ठेवून भुसावळ माहेश्वरी तहसील सभा द्वारे एक डब्बा बनविण्यात आला व तो डब्बा समाजात वाटप करण्यात आला. हा डब्बा आप आपापल्या घराच्या गच्चीवर लावून त्यात पाणी व धान्य ठेवावे जेणे करून त्याचा लाभ पक्ष्यांना होईल त्यामुळे पक्ष्यांना जीवनदान मिळेल, असा आशावाद यावेळी उजोगपती मनोज बियाणी यांनी व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ तहसील सभा अध्यक्ष प्रवीण भराडीया, सचिव राजेश लढ्ढा, प्रकल्प प्रमुख संजय लाहोटी, माहेश्वरी समाज अध्यक्ष द्वारकाप्रसाद दरगड, सचिव सत्यनारायण सोनी, समाजाचे वरीष्ठ राधेश्याम लाहोटी, समाज उपाध्यक्ष मनोज बियाणी, माहेश्वरी युवा संघटन अध्यक्ष चंद्रकांत मंत्री, सचिव महेश हेडा, संजय चांडक, भुसावळ तहसील सभा उपाध्यक्ष सुनील हेडा, गोपाल हेडा, घनश्याम दरगड, द्वारकादास हेडा, चेतन भराडीयासह समाजबाधव उपस्थित होते.

