भुसावळसह फैजपूरात भाजपा स्थापना दिन उत्साहात


भुसावळ : भुसावळसह फैजपूरात भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भुसावळात भाजपाच्या भारत माता, स्व.पंडित दिनदयाल उपाध्याय, स्व.डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रमिमा पूजन करुन, घरावर भाजपा चा ध्वज लावुन स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष रमाशंकर दुबे, भुसावळ शहर सरचिटणीस, पवन बुंदेले, अमोल महाजन, भारतीय जनता पार्टी सदस्य संदीप सुरवाडे आदींची उपस्थिती होती.

फैजपूर येथे ध्वजारोहण
फैजपूर : भारतीय जनता पार्टीचा 41 वा स्थापना दिवस कोरोनामुळे मोजक्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार उपसमिती, फैजपूर सभागृहात घेण्यात आला. याप्रसंगी जनसंघ व भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तैलचित्राला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा केंद्र (मोदी) सरकारच्या व्यक्तीगत लाभार्थी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत बूथ स्थरावून पोहचविण्यासाठी तसेच शेतकरी विधेयक बाबी व कोरोना नियमावली लसीकरण बाबी जनजागृती कार्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले पाहिजे आणि आपण व आपला परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी सरचिटणीस संजय सराफ यांनी उपस्थितांना केले.




यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रतीक वारके, पिंटू तेली, राजाभाऊ चौधरी, रामा होले, जितेंद्र वर्मा,संजीव भावसार, मनोज भावसार यासह काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.

यावलमध्ये भाजपा स्थापना दिन उत्साहात
यावल : भारतीय जनता पक्षाचा 41 वा स्थापन दिवस पक्षाचे नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाचे थोर दिवगंतांच्या प्रतिमांचे पूजन करून साजरा करण्यात आला. नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पीटल येथील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा 41वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा यावल तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, पंडीत दिनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतत्न पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली,. याप्रसंगी भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, परेश नाईक, स्नेहल फिरके, राहुल फेगडे, भाजयुवा मोर्चाचे शहराध्यक्ष रीतेश बारी, भालशिवचे गोपाळ तायडे आदी कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !