मुंबई-फैजाबापदरम्यान विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : मुंबई-फैजाबादरम्यान विशेष ट्रेन धावणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांनाप मोठा दिलासा मिळणार आहे. डाऊन 01067 लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई -फैजाबाद द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल 14 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवार आणि शनिवारी चचार वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी फैजाबादला 8.55 वाजता पोहोचेल. या गाडीला नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, बर्‍हाणपूर व खंडवा स्थानकावर थांब देण्यात आला आहे. 01068 अप स्पेशल ट्रेन फैजाबादहुन 15 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य तिलक टर्मिनस, मुंबईला 4.05 वाजता पोहोचणार आहे. या गांडीला खंडव, बर्‍हाणपूर, भुसावळ, मनमाड, नासिक रोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी 2 टीयर, 4 एसी -3 टीयर, 12 स्लीपर, 3 सेकंड क्लास सीटिंग बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !