गांधीधाम-पुरी, पोरबंदर-सांत्रागाची साप्ताहिक विशेष गाड्या धावणार


भुसावळ : प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने गांधीधाम-पुरी , पोरबंदर -सांत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधीधाम-पुरी साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 09493 डाऊन गांधीधाम-पुरी साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी गांधीधामहून रा9ी 11.05 वाजता गांधीधाम येथून सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी पुरीला 2.25 वाजता पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 09494 अप पुरी-गांधी विशेष गाडी 19 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी पुरीहून रात्री 10 वाजता सुटल्यानंतर गांधीधामला तिसर्‍या दिवशी 11.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भचाऊ, समाखीली, अहमदाबाद, वरोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, खारीयार रोड, कांताबाजी, टिटलागढ, बालनगीर, बारगढरोड, संबलपूर , अंगुल, ढेंकनल, भुवनेश्वर, खुर्दारोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पोरबंदर-सांंत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 09093 डाऊन पोरबंदर-सांंत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी पोरबंदरहून 9.05 वाजता सुटल्यानंतर सांत्रागाचीला तिसर्‍या दिवशी 6.20 वाजता पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक 09094 अप सांत्रागाची-पोरबंद विशेष गाडी 18 एप्रिलपासून
पुढील आदेशापर्यंत दर रविवारी सांत्रागाचीहून 8.10 वाजता सुटेल आणि पोरबंदरला तिसर्‍या दिवशी 18.35 वाजता पोहोचेल. या गाडीला जाम जोधपूर, उपलेटा, जेटलसार, गोंदल, भक्ती नगर, राजकोट, विरंगम, अहमदाबाद, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चांपा, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, पुरुलिया, आद्रा, बंकूरा, मिदनापूर, खरगपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

राजकोट-रेवा साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 09237 डाऊन साप्ताहिक राजकोट-रेवा साप्ताहिक विशेष गाडी 11 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी राजकोट हून 1.45 वाजता सुटेल आणि रेवा ला दुसर्‍या दिवशी 5.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 09238 अप रेवा-राजकोटे साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी रेवाहुन 10.55 वाजता सुटेल आणि राजकोटला दुसर्‍या दिवशी 10.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला वाकानेर, सुरेंद्रनगर, विरगम, अहमदाबाद, नाडियाड, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, बुर्‍हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


कॉपी करू नका.