कोरोना सुसाट : जळगाव जिल्ह्यात 1197 रुग्ण आढळले : पुन्हा 17 रुग्णांचा मृत्यू


जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 99 हजार 456 वर : आतापर्यंत 85 हजार 989 रुग्णांची कोरोनावर मात तर 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 1197 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 99 हजार 589 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 85 हजार 989 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 758 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी 1176 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू ओढवला.

शुक्रवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 260
जळगाव ग्रामीण 44
भुसावळ 180
अमळनेर 75
चोपडा 163
पाचोरा 44
भडगाव 34
धरणगाव 60
यावल 47
एरंडोल 41
जामनेर 74
रावेर 39
पारोळा 05
चाळीसगाव 51
मुक्ताईनगर 44
बोदवड 03
अन्य जिल्हा 03


कॉपी करू नका.