अनोळखी पुरूषाचा मालगाडीच्या धक्क्याने मृत्यू


भुसावळ : दुसखेडा रेल्वेस्थानकाजवळ कुठल्यातरी अनोळख्या मालगाडीच्या धक्क्याने 38 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. 29 मार्च रोजी ही घटना घडली. भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची उंची 5 फूट दोन उंच, नाक सरळ, रंग निमगोरा, डोळे मोठे, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले, चेहरा लांबट असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे नाईक प्रवीण राजगुरे (7038089615) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.