भुसावळात शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार


डॉ.नी.तू.पाटलांनी शासकीय रुग्णालयात घेतले उपचार

भुसावळ : डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षांत प्राध्यापक असलेल्या डॉ.नी.तू.पाटील यांचा डॉ. मयुर नितीन चौधरी हा आवडता विद्यार्थी. याच आवडत्या विद्यार्थाने आता डॉ.नी.तू.पाटील कोरोना पॉझीटीव्ह झाल्यावर त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली. डॉ.पाटील यांनीही शासकीय रुग्णालयात भरती होऊन शासनाच्या सेवांवर अतूट विश्वास दाखवला. नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांना 22 मार्चपासून कोरोनाचे लक्षणे जावून लागली. औषधोपचार सुरू केल्यानंतर 30 एप्रिल रोजी एचआरसीच्या रीपोर्टमेंट फुफ्फुसात 45 ते 48 टक्के इन्फेक्शन असल्याचे आढळून आले.

शिष्यानेच दिली गुरूदक्षिणा
यापूर्वीच संपर्कात असलेल्या ग्रामीण व ट्रामा सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मयुर चौधरी यांना संपर्क साधून त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. अनेक खाजगी हॉस्पीटलचा पर्याय समोर होतो, मात्र शासकिय यंत्रणेवर विश्वास ठेवत त्यांची ग्रामीण रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स पुर्ण झाले. 3 एप्रिल रोजी पूर्णपणे ठणठणीत बरे झाल्याने त्यांचा डिस्जार्ज मिळाला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी हे डॉ.नी.तू.पाटील यांचे आवडते विद्यार्थी. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात डॉ. पाटील यांनी डॉ. मयुर यांना विद्यादान केले होते. तर डॉ. मयुर यांनी कोविडच्या काळात डॉ. पाटील यांची सुश्रृषा करीत त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणाच दिली. यासोबतच डॉ. विक्रांत सोनार, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. अविनाश गवळी, सुनीता कसबे, सपना इंगळे, विद्या तायडे, इलियास शेख, गणेश चौधरी, दीपक भिरुड, महेश तायडे, चेतन भोईटे, मोनू राजपूत, योगेश गायकवाड आदींनी सहकार्य केले.

आमदार व्दयींनी घेतली काळजी
डॉ.नी.तू.पाटील हे कोरोनाबाधीत होऊन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना संपर्क साधून तब्बल 15 ते 20 मिनिट चर्चा केली. आमदार संजय सावकारे, भाजप वैद्यकिय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे यांनीही कोविडच्या काळात घ्यावयाची काळजी बाबत सांगून तब्येतीची चौकशी केली.

शल्य चिकित्सकांनी व्यक्त केली भावना
डॉ.नी.तू.पाटील वैद्यकीय व्यवसायात असल्याने ते मोठ्या खासगी रुग्णालयामध्येही उपचार घेवू शकत होते. मात्र त्यांनी शासकिय रुग्णालयातून उपचार घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनीही त्यांना या निर्णयामुळे आमच्या वैद्यकिय कर्मचार्‍यांचा हुरुप वाढल्याचे सांगितले.

नियम पाळा, कोरोना टाळा
सरकारी दवाखान्यांमधून चांगले उपचार मिळत नाही, हा लोकांचा गैरसमज आहे. खाजगीच्या तोडीस तोड उपचार करुन विशेष काळजी घेतली जात आहे. कोविडच्या या बिकट काळात वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स, सहकारी, परिचारीका सर्व प्रचंड मेहनत घेत आहे. यामुळे लोकांनी किमान नियम पाळून कोरोनापासून बचाव करावा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नी.तू.पाटील यांनी केले आहे.


कॉपी करू नका.