सोलापूर-गुवाहाटी-दौंड विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : सोलापूर-गुवाहाटी-दौंड विशेष ट्रेन धावणार आहे. 01307 विशेष ट्रेन 9 एप्रिल रोजली सोलापूर येथून 5.30 वाजता सुटेल व गुवाहाटी येथे 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजता पोहोचणार आहे. 01308 विशेष गाडी 12 एप्रिल रोजी 12 रोजी 8.30 वाजता गुवाहाटी येथून सुटेल आणि दौंड येथे 14 1ोजी 9.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड, पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. यया गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, सात द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. संपूर्ण आरक्षित 01307 विशेष गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 9 एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी आहे शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !