सावद्यात रॅक पॉईंट मंजूर मात्र सुविधांचा अभाव


मूलभूल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुराव्यांची आवश्यकता : विक्रेत्यांसह खत विक्रेत्यांची बैठक

सावदा : सावदा येथे रासायनिक खतांचा अर्धा रँक मंजूर असून विक्रेते व वितरक यांनी रॅक उतरविण्यासाठी सहमती दर्शवली असली तरी मात्र सावदा रेल्वे स्टेशन येथे मुलभुत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रासायनिक खते निर्मिती कंपनीच्या प्रतीनिधी अनुकूल नसल्याची माहिती समोर आली आहे. सावदा येथील रॅकसाठी शेतकर्‍यांना अजुन काही काळ वाट बघावी लागणार आहे. सर्व रासायनिक निर्मिती कंपन्या या केंद्राची संलग्न असतात कोणत्या जिल्ह्याला किती खत द्यायचं हे केंद्र सरकार ठरवित असते. त्यामुळे खासदार यांनी माहीती घेऊन विक्रेत्यावर व वितरकांवर बोट ठेवण्यापेक्षा सावदा रेल्वे स्टेशन येथील माल धक्क्यावर मुलभुत सुविधांवर भर दिली तर शेतकर्‍यांचा कायमचा प्रश्न मिटेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. येथे मुलभुत सुविधा उपलब्ध करून दल्यास रासायनिक खतांचा रॅक उतरवीणार असल्याची माहिती 8, रोजी महाराष्ट्र राज्य फर्टीलाईझर (माफदा) चे अध्यक्ष विनोद तराळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत देण्यात आली. या बैठकीत रासायनिक खतांचे काही विक्रेते, रासायनिक खत कंपन्यांचे प्रतीनिधी , ट्रान्सपोर्ट चालक प्रतीनिधी जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, माफदाचे उपाध्यक्ष कैलास मालु जिल्हा मोहिम अधिकारी महाजन, जिल्हा डिलर्स असोशियन चे अध्यक्ष राजु पाटील सुनील कोंडे शासनाच्या नियमांचे पालन करत
उपस्थित होते.

सावदा येथील शेड भंगारात
सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खतांचा मालधक्का मंजुर झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात येथील शेड भंगार मधे काढण्यात आला होता. तो अद्यापही नव्याने तयार करण्यात आलेला नाही. येथे शेड नाही. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोण्या ठेवायच्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावदा रेल्वे स्टेशन येथे गोदाम नाही
रेल्वेने दिलेल्या कालावधीत रेल्वे डबे खाली न केल्यास कंपन्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. सावदा रेल्वे स्टेशन येथे अधा रॅक म्हणजे बीसीएन दर्जा चे माल वाहतूक रेल्वे 21 डबे मंजूर आहे.एका डब्यात 1280 गोण्या बसतात म्हणजे 21 डब्यात 26 हजार 880 गोण्या बसतात. एका दिवसात एवढ्या मालाची वाहतुक शक्य नाही.

मूलभूत समस्या सोडवाव्यात
येथे गोडावुन नसल्याने येवढ खत उतरवील्यावर ते ठेवायच कुठे? अशा दुहेरी संकटात खत कंपन्या सापडल्या आहे
सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खते उतरविण्यासाठी ज्या मुलभुत सोई सुविधा लागतात, त्यांचा अभाव असुन त्या सोडविण्यात याव्या. जेणेकरून कंपन्या रँक उतरून शेतकर्‍यांना वेळेवर खत मिळतील, अस
माफदा अध्यक्ष विनोद तराळ म्हणाले.

रँक पॉईंट पाठपुरावा करणार
गतवर्षी खतांचा तुडवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच आमदार शिरीष चौधरी व मीगुलाबराव पाटील यांचे माध्यमातून जिल्हाअधिकारी यांचे कडुन सावदा येथे रँक पाँईट मंजुर करुन घेतला होता. सावदा येथे रँक पाँईट लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जिल्हाअधिकारी यांना पुन्हा पत्र व्यवहार केला आहे. रँक पाईट सुरु होईल तोपर्यंत पाठपुरावा करत राहू., असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.