गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद


मुक्ताईनगर पोलीस तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात सभेच्या ठिकाणी पत्रकाराचा चोरीस गेलेला मोबाईल गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या करणार्‍या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा तसेच मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. शंकर मधुकर निकम (गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतीली आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. मुक्ताईनगर येथील भुसावळ रोड वरील गोदावरी मंगल कार्यालयात 12 फेब्रुवारी रोजी जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेत आरोपी पत्रकार संदीप जोगी यांचा मोबाईल लांबवल्याचा आरोप आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व हवालदार संजय हिवरकर राजेश मेढे , रवी नरवाडे , संतोष मायकल , संदीप धनगर, रावसाहेब पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे संदीप धनगर आदींच्या पथकाने केली. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे , उपनिरीक्षक निलेश सोळंके, ए.एस.आय. सादिक पटवे, हवालदार संतोष नागरे , हवालदार श्रावण जवरे यांनीही सहकार्य केले.


कॉपी करू नका.