सावद्यात दरोडा टाकण्याच्या तयारीतील तिघे जाळ्यात


सावदा : बसस्थानकामागील शेतात दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या 3 जणांना सावदा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून दोन संशयीत पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींजवळून सावदा पोलिसांनी एक गावठी कट्टा, लोखंडी रॉळ, व मिरची पूड हस्तगत केली. सावदा येथे 9 रोजी रात्री 9 – 30 वाजे दरम्यान बस स्टॅन्ड मागील ही कारवाई करण्यात आली.

दरोड्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
सावदा पोलिसांना रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून सदर कार्यवाही करत बस स्टॅन्ड मागील भागात असलेल्या शेतात दरोडा टाकण्याचे उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन संशयीतांना अटक केली. मुजाहिद खान उर्फ माया उर्फ मज्जू इब्राहिम खान (26, रा.मदिना मज्जीद जवळ लाला गंज, बर्‍हाणपूर)फ, शेख रईस उर्फ मास शेख इस्माईल (28, रा.गौसिया नगर, सावदा) व राहुल वाल्मिक आदिवाल (26 रा.वाघोदा बु.॥, ता.रावेर) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली यावेळी त्यांचे सोबत असलेले आणखी 2 साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.