जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1201 रुग्ण आढळले
24 तासात पुन्हा 16 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत कोरोनामुळे 1809 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1195 रुग्णांची मात
जळगाव : जिल्ह्यात 24 तासात मात्र पुन्हा 1201 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 16 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1809 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 3009 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 89 हजार लाख 460 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 1195 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांपुढे पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 213
जळगाव ग्रामीण 33
भुसावळ 124
अमळनेर 220
चोपडा 104
पाचोरा 69
भडगाव 15
धरणगाव 36
यावल 66
एरंडोल 81
जामनेर 33
रावेर 122
पारोळा 09
चाळीसगाव 04
मुक्ताईनगर 56
बोदवड 09
अन्य जिल्हा 09



